काय हे वाचून काहीतरी वेगलेच वाटले ना ? खर तर ही काही गोष्ट नाही...आहे एक असेच आपले काही तरी तुमच्या बरोबर Share करावेसे वाटलेले...तसे काही फार अवघड नाही अतिशय सोपी आणि साधारण गोष्ट आहे...जी सगाल्याना माहित असलेली आणि कधीतरी अनुभवलेली अशी....तर आता या गोष्टी तल्या तो ची ओळख करून घेवुयात...हा तो म्हणजे माझा सगळ्यात जवलचा मित्र...कायम माझ्या बरोबर रहाणारा...माझ्या मानत रहाणारा आणि मुख्य म्हणजे कोणालाच न दिसणारा असा माझा दोस्त...जरा स्वतः च्या मनात थोड़े नीट बघा म्हणजे तुम्हाला ही सापडेल तुमचा तो/ ती....सापडला ना ????म्हणजे आता तुम्हाला नीट समजले असेल मी काय म्हणतो आहे ते..ह्या माझ्या दोस्ता बरोबर मी काय काय करतोआम्ही काय गप्पा मारतो...हे तसे संगाने अवघड आहे... मलाच नाही तर कोणाला ही...आता ओळख ती ची...अणि इथेच तर खरी गम्मत आहे कारण तुम्ही म्हणाल की "तो" ला आम्ही समजुन घेवू पण ही "ती" ची काय भानगड...खर तर भानगड आहे पण आणि नाही पण....चला मी तुम्हाला सुरुवाती पासून सांगतो काय झाले ते...एकदा पावसाळ्यात कधी नव्हे तो कॉलेज ला गेलो होतो..अणि नेमके कोणी मित्र बरोबर नव्हते...कधी कधी अशी वेळ मला आवडते कारण "तो' सोबत गप्पा मारता येतात...आणि मी एकटा कधीच नसतो तो कायम माझ्या बरोबर असतोच...खरच ह्या दोस्ता बरोबर मस्त रंगतात, कधी वाद होतात, एकमेकांचे पटत नाही...पण हे सगळे तर चालायचेच ना...हा तो सुद्धा कधी कधी नकोसा होतो आणि कोणी तरी कल्पने बाहेरची व्यक्ति बरोबर हवी असते...असो तो भाग वेगला आहे त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू...तर कॉलेज मधले काम नेहमी प्रमाने लगेच झालेच नाही...फार संताप होत होता..अणि वर तो पण शिव्या द्यायला उद्युक्त करत होता, मग कॉलेज बाहेर गाड़ी काढताना (अर्थात दोघे ही मूड मधे नव्हतो) अचानक "ती" दिसली आणि नेहमी प्रमाने ती माझ्या कड़े बघून हसली....तसे आम्ही एकमेकाना आधी पासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि असे हसण्याची काही पहिलीच वेळ नव्हती पण का काय माहित पण आज "ती" काहीतरी वेगलीच भासली...आणि गम्मत म्हणजे तो मला अचानक म्हणाला "दोस्ता आता आपल्या गप्पांमधे भाग घेणारी तीसरी व्यक्ति आली आहे" त्याच्या म्हन्याचा अर्थ तेव्हा नाही कलला...पण हलू हलू लक्षात यायला लागले...आणि खरच तो म्हणाला तसा ती आता तो बरोबर मनात रहू लागली होती....(ऐकायला थोड़े विचित्र वाटत असेल ना ? पण खर आहे हे..) आणि काही दिवसात ती आल्याने माझ्या विचारात खुप बदल झाले...आणि मी आता "तो" ऐवजी "ती" बरोबर जास्ती गप्पा मारू लागलो होतो...तो कुठे तरी मागे पडत चालला होता...हल्ली ती माझ्या मनातच असते,माझ्यावर चिडते, मी चिडलो की मला समजावते...माझ्या बरोबर हसते, अणि तीच माझे सांत्वन करते......मी जिंकलो की कौतुक करते, आणि चुकलो तर क्षमा ही करते.....माझ्या बरोबर कविता वाचते, त्याचा न समजलेला अर्थ समजावून ही देते...माझ्या बरोबर न थकता गप्पा मरते, आणि माझ्याशी अबोला ही धरते....हो हल्ली ती माझ्या मनातच असते......इतकी की प्रश्न पडावा की जितकी ती माझ्या मनात असते तितकी स्वतः च्या मनात तरी असेल का?????कधी कधी वैताग येतो तिचा॥अगदी ती नकोशी वाटते...तेव्हा नेहमी प्रमाने मागे पडलेला "तो" पुढे येतो म्हणतो "दोस्ता अजुन किती ती चा आधार घेणार आहेस जरा ती ला पण दे..."आणि मन परत नविन गोष्टीं साठी फ्रेश होते...
मला ह्या गोष्टीचा शेवट अजुन समजत नाही आणि तो समजावा असे वाटत पण नाही...कारण जे चालले आहे मला तेच हवे आहे...मला तेच हवे आहे....
(आता सांगितलेली गोष्ट/ मांडलेले विचार हे पूर्ण पणे काल्पनिक आहेत..ह्याची नोंद घ्यावी....)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा