काय हे वाचून काहीतरी वेगलेच वाटले ना ? खर तर ही काही गोष्ट नाही...आहे एक असेच आपले काही तरी तुमच्या बरोबर Share करावेसे वाटलेले...तसे काही फार अवघड नाही अतिशय सोपी आणि साधारण गोष्ट आहे...जी सगाल्याना माहित असलेली आणि कधीतरी अनुभवलेली अशी....तर आता या गोष्टी तल्या तो ची ओळख करून घेवुयात...हा तो म्हणजे माझा सगळ्यात जवलचा मित्र...कायम माझ्या बरोबर रहाणारा...माझ्या मानत रहाणारा आणि मुख्य म्हणजे कोणालाच न दिसणारा असा माझा दोस्त...जरा स्वतः च्या मनात थोड़े नीट बघा म्हणजे तुम्हाला ही सापडेल तुमचा तो/ ती....सापडला ना ????म्हणजे आता तुम्हाला नीट समजले असेल मी काय म्हणतो आहे ते..ह्या माझ्या दोस्ता बरोबर मी काय काय करतोआम्ही काय गप्पा मारतो...हे तसे संगाने अवघड आहे... मलाच नाही तर कोणाला ही...आता ओळख ती ची...अणि इथेच तर खरी गम्मत आहे कारण तुम्ही म्हणाल की "तो" ला आम्ही समजुन घेवू पण ही "ती" ची काय भानगड...खर तर भानगड आहे पण आणि नाही पण....चला मी तुम्हाला सुरुवाती पासून सांगतो काय झाले ते...एकदा पावसाळ्यात कधी नव्हे तो कॉलेज ला गेलो होतो..अणि नेमके कोणी मित्र बरोबर नव्हते...कधी कधी अशी वेळ मला आवडते कारण "तो' सोबत गप्पा मारता येतात...आणि मी एकटा कधीच नसतो तो कायम माझ्या बरोबर असतोच...खरच ह्या दोस्ता बरोबर मस्त रंगतात, कधी वाद होतात, एकमेकांचे पटत नाही...पण हे सगळे तर चालायचेच ना...हा तो सुद्धा कधी कधी नकोसा होतो आणि कोणी तरी कल्पने बाहेरची व्यक्ति बरोबर हवी असते...असो तो भाग वेगला आहे त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू...तर कॉलेज मधले काम नेहमी प्रमाने लगेच झालेच नाही...फार संताप होत होता..अणि वर तो पण शिव्या द्यायला उद्युक्त करत होता, मग कॉलेज बाहेर गाड़ी काढताना (अर्थात दोघे ही मूड मधे नव्हतो) अचानक "ती" दिसली आणि नेहमी प्रमाने ती माझ्या कड़े बघून हसली....तसे आम्ही एकमेकाना आधी पासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि असे हसण्याची काही पहिलीच वेळ नव्हती पण का काय माहित पण आज "ती" काहीतरी वेगलीच भासली...आणि गम्मत म्हणजे तो मला अचानक म्हणाला "दोस्ता आता आपल्या गप्पांमधे भाग घेणारी तीसरी व्यक्ति आली आहे" त्याच्या म्हन्याचा अर्थ तेव्हा नाही कलला...पण हलू हलू लक्षात यायला लागले...आणि खरच तो म्हणाला तसा ती आता तो बरोबर मनात रहू लागली होती....(ऐकायला थोड़े विचित्र वाटत असेल ना ? पण खर आहे हे..) आणि काही दिवसात ती आल्याने माझ्या विचारात खुप बदल झाले...आणि मी आता "तो" ऐवजी "ती" बरोबर जास्ती गप्पा मारू लागलो होतो...तो कुठे तरी मागे पडत चालला होता...हल्ली ती माझ्या मनातच असते,माझ्यावर चिडते, मी चिडलो की मला समजावते...माझ्या बरोबर हसते, अणि तीच माझे सांत्वन करते......मी जिंकलो की कौतुक करते, आणि चुकलो तर क्षमा ही करते.....माझ्या बरोबर कविता वाचते, त्याचा न समजलेला अर्थ समजावून ही देते...माझ्या बरोबर न थकता गप्पा मरते, आणि माझ्याशी अबोला ही धरते....हो हल्ली ती माझ्या मनातच असते......इतकी की प्रश्न पडावा की जितकी ती माझ्या मनात असते तितकी स्वतः च्या मनात तरी असेल का?????कधी कधी वैताग येतो तिचा॥अगदी ती नकोशी वाटते...तेव्हा नेहमी प्रमाने मागे पडलेला "तो" पुढे येतो म्हणतो "दोस्ता अजुन किती ती चा आधार घेणार आहेस जरा ती ला पण दे..."आणि मन परत नविन गोष्टीं साठी फ्रेश होते...
मला ह्या गोष्टीचा शेवट अजुन समजत नाही आणि तो समजावा असे वाटत पण नाही...कारण जे चालले आहे मला तेच हवे आहे...मला तेच हवे आहे....
(आता सांगितलेली गोष्ट/ मांडलेले विचार हे पूर्ण पणे काल्पनिक आहेत..ह्याची नोंद घ्यावी....)
भीती एक असा शब्द जो जितका नकोसा वाटतो, तितकाच जास्त वापरला जातो.....त्याची रुपे वेगवेगळी असतात...कधी संशय, कधी कालजी, तर कधी प्रत्यक्षात भीती......माझ्या मते आपल्या मनाने स्वतःचा एक कोपरा हा कायम स्वरूपी या "भीती" ला देवून टाकला आहे...आणि या कोपर्यात इतर विचाराना जायची पण "भीती" वाटत असावी...कारण मनात येणारा विचार हा भीती ला गृहीत धरुनच येतो....आणि हे विचार जर एखाद्या निर्णया साथी केले जाट असतील तर नक्कीच भीती तेथे असते....भीती चे प्रमाण हे त्या व्यक्ति वर आणि त्या प्रसंगावर पण अवलंबून असते म्हणा!!!!!!बर्याचदा अनेकाना वाटणारी भीती...आणि तिचे उगमस्थान हे एकच असते....पण आपल्या मनात असणार्या भीती चे प्रकार वेग-वेगले असतात...( काही समजले नाही ना???? त्यासाठी एक उदाहरण देतो...बघू जमते आहे का ते.....)उदाहरण तसे फार पूर्वीचे आहे...पण आहे मात्र चिरकाल....
महाभारतात एक अशी व्यक्ति होती जिची अनेकाना अनेक गोष्टीं साठी भीती वाटत असायची...... ती व्यक्ति म्हणजे कर्ण!!!!!कर्णाची जर कोणाला भीती वाटत नसेल तर फ़क्त कृष्णाला....कारण कृष्ण हा कर्णाला (त्याच्या विचाराना ओलखुन होता...) गुरु द्रोनाना भीती होती की कर्ण त्यांच्या आवडत्या शिष्याला (अर्जुन) हरवेल....अर्जुनाला भीती होती ती आपण कर्ण समोर कमी पडू ह्याची....कुंती ला भीती होती ती सत्य बाहेर येइल ह्याची..आणि अजुन एक भीती होती ती कालजी......
शोण ( कर्ण च लहान भाऊ) त्याला भीती होती की आपल्या दादा ला काही होइल....भीष्म ला भीती होती की एक पांडव च बाकीच्या पांडव ना मारेल.....बाकि पांडव ना भीती होती ती कर्ण च्या शक्ति ची.....आणि दुर्योधन ला भीती होती ती कर्ण आपले वचन मोडेन ह्याची.....पाहिलेत एकच व्यक्ति पण लोकाना त्याची भीती किती आणि किती वेगळ्या स्वरूपात... भीती हा शब्द असा आहे की आपण त्याचे चांगले आणि वाईट अशी तुलना करुच शकत नाही...पण मी शोधतो आहे ती भीती ची चांगली बाजू...तुम्ही ही शोधा आणि सांगा तुम्हाला सापडली तर......
मागच्या भागात जसे मी म्हणालो की, मला अनेक Problem face करावे लागले.... पण खर तर त्या प्रश्नांची अथवा त्या Problems ची सुरुवात भारतात असताना होइल (त्या Haneymoon period नंतर) असे वाटले नव्हते...त्या प्रश्नांची सुरुवात जानेवारी end पासून चालू झाली.....२८ जानेवारी २००९ ला मी normal check up साठी म्हणुन गेलो असताना, एक विचित्र गोष्ट घडणार आहे याची कल्पना नव्हती....आणि मला अजुन १२ दिवस जास्तीचे भारतात रहायला मिळेल ह्याची पण.....दिनांक २९ जानेवारी २००९ ला माझ्या कानाचे operation करावे लागले..."Surgery" शब्द काहीसा नकोसा आणि भयानक वाटतो ना?? (पण गम्मत म्हणजे Aus मधे OPD ला Surgery म्हणतात म्हणे....हे ऐकून मला हसायला आले...)या Operation मुले माझे सगळे schedule बिघडले...मी ६ फेब्रुवारी ऐवजी १८ फेब्रुवारी २००९ ला इथे आलो....
आधी सारखे वाटायचे की मी इथे आलो की आताचे माझ्या अवती भोवती चे जग कसे वागेल...माझ्या ओलखीचे लोक तेव्हा काय करत असतील....मी जाण्याने त्यांच्या जीवनात कही फरक पडेल का????? आणि मला या सगाल्याचे अजुन १२ दिवस निरिक्षण करता येइल हे समजुन खुप आनंद झाला....पण या सगाल्यातुन नंतर असे वाटले की, खरच ह्या मिलालेल्या १२ दिवसात मी काय कमावले आणि काय गमावले......(तुम्ही म्हणाल की हा Accounts चा student असल्याने सतत Profit or Loss चा विचार करत असतो पण तसे कही नाहीये...)मी काय कमावले तर ghari रहन्याचा आनंद जो खरच कश्याहून ही मोठा आहे, आणि कही गमावले असेलच तर ते भारतात नही इथे Aus madhe गमावले आहे, का आणि कसे ते आता शब्दात मांडने अवघड आहे....
दिनांक १८ फेब्रुवारी २००९ हा दिवस मी ठरवून ही नही विसरु शकत...या एक दिवसात माझ्या मनात विचारांची किती आंदोलने झाली की काय सांगू? माझ्या mate मी इतका अंतर्मुख या आधी कधीच झालो नव्हतो...असे काय झाले होते अथवा काय घडत होते त्या दिवशी ह्याचे उत्तर मी अजूनही शोधतो आहे....त्या दिवशी येणारा प्रत्येक Phone आणि Message हा माझी ताकद वाढवत होता की कमी करत होता हे मी कसे सांगू?????अर्थात इथे येणार्या प्रत्येकालाच हा अनुभव आला असेल....पण शेवटी माझ्या मनाचे कौतुक मी nahi करणार तर कोण करणार....तसा विमान प्रवास मला कही नविन नव्हता...पण भरता बाहेर मी पहिल्यांदाच चाललो होतो....ह्या प्रवासात मी परत कधी येणार हे पण माहित नव्हते..(अर्थात मी कधी ही ठरवले तर परत येवू शकतो हे माहिती असून देखिल असे विचार मनात येतच होते...)पण हे आज इतक्या दिवसंनातर मागे पहाताना, याचा विचार मी त्रयस्थ pane करू शकतो आहे, तसाच विचार मी अनेक दिवसानी आज बद्दल करत असणार ह्या बद्दल मला khaatri आहे असो......( अर्थात मी तुम्हाला माझ्या विमान प्रवास बद्दल काहीच सांगणार नाहीये कारन माझ्या mate हा असा अनुभव आहे जो प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कल्नार नाही...त्या बद्दल माफ़ करा)
ह्या १२ तासांच्या प्रवासात मी अनेक विषयांवर विचार करत होतो....का ते माहित नाही......सगळे विषय kaahi lakshat नाही पण kahi khas असे विषय aahet की je janiv purvak lakshat thevale aahet.......कारन मला असे vatate की aapalya manaat येणारे ekhadya vishaya baddalche विचार हे परत tyach pramane yetilch हे sangne अवघड आहे, तर ते विचार manatun janya आधी ते lihun kadhale pahijet असे tharvunch basalo आहे.......
या bhagatil kahi shabd फार विचित्र होत होते म्हणुन te English मधे aahet.........
भाग २ मधे काही चुका आहेत, कृपया समजुन घ्यावे......
जस जसा पहिल्या भगा वरून पुढे काय? ह्याचा विचार करत गेलो, तेव्हा अगदी पहिल्या पासून सुरुवात करावी असे वाटले...(घाबरू नका मी कही तुम्हाला माझ्या जन्मापासून ची गोष्ट नही सांगणार आहे.....हे सगळे वाचत असताना पु ल नच्या असा मी असामी ची आठवां झाली असेल न? खरा तर त्याचीच copy करायची इछा होती...पण सधी ती पण नही जमली...) तर सुरुवात म्हणजे मी ऑस्ट्रेलिया ला यायचे ठरवले होते तेव्हा पासून... कधी कधी वाटते काय वाईट होते भारतामधे...मस्त आयुष्य चालले होते...घर, मित्र, कॉलेज, क्लास, ट्रेक्किंग, आणि आमचा कट्टा....... पण मनात काहीतरी वेगले करायचे होते, कही तरी सॉलिड आणि माहित नाही का पण आधी पासून मला बाहेर येवून शिक्षण घेण्याची फार इच्छा होती...(बहुदा यशराज फिलम्स च परिणाम असावा) S Y Bcom मधे असताना मी CET, काट या गोष्टींचा फार विचार करायचो (रिकाम्या वेळात) पण नन्तर ठरले की बाहेर जावून मस करायचे...त्यासाठी मी स्वतःला ब्कॉम मधे Distinction मिलवायाचे लक्ष्य दिले आणि गम्मत म्हणजे ते लक्ष्य फ़क्त बोटा वर मोजन्या एवढ्या marks ने राहिले....तरी पण मी खुश होतो, तसाच IELTS पण पास झालो...आणि UTS ला admission पण मिलाली...(हे वाचतना फार मस्त आणि सहज वाटत असेल पण त्या साठी थोड़ा फार मनस्ताप पण सोसावा लागला आहे) जेव्हा मी VISA साठी apply केला तसा मी स्वप्नात जगायला लागलो....मला माझे एक मस्त आयुष्य दिसत होते पण त्या आधी बाहेर सेट होण्याच्या वेळेस होणार्या तरसा ची काहीच कल्पना नव्हती....(मी आणि माझे मित्र त्याला honeymoon period म्हणायचो....का ते ज्याना अनुभव आहे त्याना बरोबर समझले असेल....)
अनेक दिवसांपासून काहीतरी लिहावे असे वाटत होतेपण योग्य तसे अथवा मनाला पटेल असे कही सुचत नव्हते, शेवटी इतके दिवस थाम्बुन काहीच न सुचल्याने असेच कही तरी लिहायचे असे ठरवून बसलो आहे, आता पर्येन्त अनेक जणांचे "आत्मचरित्र" (शब्द थोड़ा जड़ वाटतो ना ?) म्हणुन मी त्याला "अनुभव" म्हणतो, तर असे वाचताना आपण ही असेच कही तरी लिहावे असे सारखे वाटायचे, बरोबर बरोबर ! तुमच्या मनातला विचार योग्यच आहे, की मी स्वतःला कोण समजतो? माझे कर्तुत्व काय? मी असा कोण लागुन गेलो स्वतः चे अनुभव लिहायला? मान्य एकदम मान्य की मी कोणी मोठी, कर्तबगार व्यक्ति नही आणि होणार ही नाही........(माझ्या बद्दल सदिच्छा असणारे म्हणतील की होशील रे!!!!! पण खर सांगू माझी मलाच खत्री नाहीये... असो) शेवटी मी साधा विचार केला की लिहिणारा मी च आहे आणि वाचणारे तुम्ही च आहात... आणि मी अणि तुम्ही मधे काही जास्ती अन्तर नाहीये.......
चला तर मुळ मुद्दया कड़े वलुयात मी Australia मधे आलो आणि मला परिचित असलेल्या व्यक्ति बदलेल्या वाटल्या, अनेक मित्रं शी आणि नातेवैकां शी बोलणे होत होते.......पण सगलेच वेगले वाटत होते॥ असे का अनेक दिवस वाटत राहिले आणि मग माझ्या लक्षात आले की माझ्या परिचित व्यक्ति नाही तर मीच बदललो आहे ते........याचे कारण काय असा विचार करताना अनेक गोष्टी मानत आल्या आणि आता मी त्याच लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.......... हा प्रयत्न खर तर माझ्याच साठी उपयोगाचा आहे ..कसा ते वाचताना लक्षात येईलच....
namskar mi Aditya Risbud, ek average naav...... nav aikun kahi khas vatnar nahi ase...aani khara vicharal tar mala hi asech vatate ki konala hi kahi vatu naye...
aata thoda mazhya baddal....
mi Bcom zalo aahe aani sadhya Australia madhe Ms in accounting karato aahe..(thamba thamba mi ajun hi hech sangato aahe ki mazhya baddal ajun kahi mat banavu naka...).
Mazhya anek Mitrani blog baddal sangitale, kahini tar svatah che blog mala vachayala pathavale...survatila mala tyat kahi interest navhata pan thoda vichar kela aani ase lihine he mazhya sathi kiti upyogache aahe he mzhya lakshat aale. Aare! mul mudda tar rahunch gela, mi mazhya baddal sangat hoto... tar mi Aus madhe Ms karato aahe. Mi mulcha Nashik cha aani aata kahi divasan purvich Aus madhe aalo aahe. Khup da vatayache ki aapalya manat yenare vichar lihun thevave aani kadhi tari kunala tari vachayala dyave...(jyachya kadun Stuti aikayala milel, ashyach Manasala...) pan manat la Kantala sharirala kahi karuch det navhta...pan aata aaj tari tharvun basalo aahe ki lihaychech. pan Gammat ashi zali aahe ki aaj Man tayar aahe pan Dokyatun kahi apekshit ashya goshti baherch padat nahiyet....thik aahe suruvat tar zali aahe baghu pudhe nakkich kahi tari Changale lihin....